बोदवडच्या त्या मद्यपी पोलिसाचे अखेर निलंबन


बोदवड : तालुक्यातील घाणखेडा यथीले सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या विनोद रामशंकर सोनवणे या मद्यपी पोलिस कर्मचार्‍याचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. 4 रोजी मध्यरात्री गस्तीवर असताना या पोलिस कर्मचार्‍याने अंगातील कपडे काढून नग्नावस्थेत गावात धिंगाणा घातल्याची बाब समोर आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या बाबीची दखल घेत या पोलिसाला निलंबित केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !