धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 520 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 14863 वर : 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी पुन्हा 520 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 14 हजार 863 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 613 झाली आहे. दरम्यान, एकाच दिवसात जळगाव शहरात 154 तर जामनेरात 71 व चाळीसगावात 55 रुग्ण आढळले आहेत.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 154
जळगाव ग्रामीण 39
भुसावळ 17
अमळनेर 34
चोपडा 13
पाचोरा 11
भडगाव 16
धरणगाव 06
यावल 13
एरंडोल 40
जामनेर 71
रावेर 07
पारोळा 11
चाळीसगाव 55
मुक्ताईनगर 25
बोदवड 03
अन्य जिल्हा 05

