मंगला एक्स्प्रेसच्या मार्गात बदल : गोवा एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट


भुसावळ : कोकण रेल्वेमधील कारवार सेक्शनमधील मादुरे आणि पेरनेम स्टेशन दरम्यान सुरंगात भिंत पडल्याने रेल्वे वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. डाऊन 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस ही गाडी 9 ते 20 ऑगस्ट 2020 दरम्यान मडगाव, लोंडा, मिराज, पुणे, पनवेल, कल्याणमार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनपर्यंत धावणार आहे. अप 02618 अप हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस 9 ते 20 ऑगस्ट 2020 दरम्यान पनवेल, पुणे, मिराज, लोंदा, मडगाव मार्गे एर्नाकुलम स्थानकावर जाणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अप-डाऊन गोवा एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट
अप 02780 हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस प्रस्थान स्थानकापासून 9 ते 23 ऑगस्टदरम्यान हुबळी स्थानकापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ही गाडी लोंडा ते मडगांवपर्यंत रद्द राहणार आहे. डाऊप 02779 मडगाव- हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस 9 ते 23 ऑगस्टदरम्यान हुबळी स्टेशनहुन प्रस्थान करणार असून ही गाडी मडगांव ते लोंडा दरम्यान रद्द राहणार आहे. रेल्वे प्रवाशांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !