रावेरात स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन
दुकानदारांसह नॉमिनीद्वारे धान्य वाटपाला मागितली परवानगी
रावेर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संसर्ग टाळण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार व त्यांचे नॉमिनीद्वारे धान्य वाटपाची मंजुरी मिळावी म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांतर्फे सोमवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पडताळणी स्थगितीची मागणी
निवेदनाचा आशय असा की, शासनाच्या ई पॉस मशीनवर लाभार्थींची पडताळणी करून धान्य वाटपाचे निर्देश आहेत परंतु लाभार्थींची आधार पडताळणी करताना येणार्या अडचणींचा विचार करता ही पडताळणी कोरोना विषाणूचे संक्रमण नष्ट होईल तो पर्यंत स्थगित करावी तसेच स्वस्त धान्य दुकानदाराला 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानदाराला कीट पुरविण्यात यावे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे कमिशन त्वरीत द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार विठ्ठल पाटील, काशीनाथ शिंदे, गुणवंत पाटील, दिलीप साबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

