शिवरायांचा पुतळा हटवणार्या कर्नाटक सरकारचा रावेरात निषेध
रावेर : कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा हटविण्यात आल्याच्या घटनेचा रावेरात निषेध व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तहसील व पोलिस प्रशासन यांना निवेदन देऊन कर्नाटक सरकारने पुतळा त्याच जागेवर बसवण्याची मागणी करण्यात आली.
त्याच जागेवर बसवावा पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर बसविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर रा.यु.काँ.जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, शहराध्यक्ष महेमुद शेख, प्रणित महाजन, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, रा.काँ.विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, विद्यार्थी तालुकाध्यक्ष साईराज वानखेडे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव महाजन, शुभम मराठे, शुभम पाटील, निशीकांत बिंबे, विक्रांत मराठे, सोनल महाजन, आकाश चौधरी, धनराज महाजन, सुयोग पाटील, बंटी लोखंडे, प्रशांत चौधरी, नयन अत्तरदे,गणेश देवगिरीकर, नितीन पाटील, जितेंद्र साबळे, चेतन पाटील, अमोल पाटील, कुणाल महाले, विकास पाटील, योगेश पाटील, श्रीराम पाटील, भूषण पाटील, हर्षल महाजन, प्रशांत पाटील, रीतीक कोळी, प्रशांत पाटील, आकाश पाटील, चिंतन आसेकर, कुणाल सपकाळे, सुयोग पाटील, योगेश पाटील, भूषण पाटील, किशोर पाटील, किरण पाटील, राहुल पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

