अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात आजपासून मुख्य सुनावणी
नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जमीन नेमकी कुणाची ? या प्रकरणाबाबत मंगळवार, 6 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होत आहे. अयोध्या प्रकरणात 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला होता. यावेळी कोर्टाने वादग्रस्त जमीन तीन भागांमध्ये वाटण्याचा निकाल दिला होता. यापैकी दोन तृतीअंश जमीन राम मंदिरासाठी आणि एक तृतीअंश जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निकाला दोन्ही पक्षकारांना अमान्य होता. त्यानंतर गेल्या आठ-नऊ वर्षात सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भातली मोठी घडामोड घडलेली नाही. त्यामुळे आता 6 ऑगस्टपासून सुरु होणारी ही सुनावणी देशाला अयोध्या प्रश्नावरचं अंतिम उत्तर कधी देते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.