बंग्लोर-नवी दिल्ली व गोरखपूर-बांद्रा टर्मिनस विशेष गाडीच्या वेळेत बदल
भुसावळ : भुसावळ विभागातून जाणार्या दोन गाड्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. बंग्लोर-नवी दिल्ली व गोरखपूर-बांद्रा टर्मिनस विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
बंग्लोर-नवी दिल्ली विशेष गाडी
डाऊन 06527 बंग्लोर-नवी दिल्ली विशेष गाडी प्रस्थान स्टेशनवरून 17 डिसेंबरपासून मनमड, जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर व खंडवा स्थानकावर थांबणार आहे. अप 06528 नवी दिल्ली-बंग्लोर विशेष गाडी 17 डिसेंबरपासून खंडवा, बर्हाणपूर, भुसावळ, जळगाव, मनमाड स्थानकावर थांबणार आहे.

गोरखपूर-बांद्रा टर्मिनस विशेष गाडी
अप 05067 गोरखपूर-बांद्रा टर्मिनस विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 16 डिसेंबरपासून खंडवा, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबणार आहे. डाऊन 05068 बांद्रा टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 18 डिसेंबरपसून प्रस्थान स्टेशनवरून जळगाव, भुसावळ व खंडवा रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

