मालोद अंगणवाडीतून चोरट्यांनी गॅस शेगडी लांबवली
यावल : तालुक्यातील मालोद येथील अंगणवाडीतून अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाक करण्याचे दोन गॅसचे कनेक्शन चोरून नेल्याचा प्रकार गुरूवारी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तालुक्यातील मालोद जामन्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अंगणवाडी क्रमांक 1 व 2 येथे विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकासाठी दोन गॅस कनेक्शन ठेवण्यात आले आहे. मंगळवार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता शाळेच्या खोल्यांना कुलूप लावून घरी निघून गेल्यानंतर चोरयांनी अंगणवाडीतील आठ हजार रुपये किंमतीचे दोन गॅस कनेक्शन लांबवले तर गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अंगणवाडी सेविका जरीना तडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपासह हवालदार विजय पाचपोळ करीत आहेत.

