रावेरात कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ


सर्व शेतकर्‍यांकडील कापूस खरेदीनंतरच केंद्र व्हावे बंद : माजी आमदार अरुण पाटील

रावेर : सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला असून अनंत प्रयत्नानंतर रावेर शहरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व शेतकर्‍यांकडील कापूस खरेदी झाल्यानंतर ते बंद करावे, असे आवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी येथे केले. रावेर-बर्‍हाणपूर महामार्गावरील श्री गणेश जिनिंगवर (सीसीआय) भारतीय कापूस निगमतर्फे शनिवारी कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील 450 शेतकर्‍यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शनिवारी खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी प्रथम आलेले शेतकरी बाळू पांडुरंग पाटील यांचा कापूस मोजण्यात आला. 40 ट्रॅक्टर कापूस विक्रीसाठी जिनिंगवर आले होते.

यांची होती उपस्थिती
कापूस खरेदीच्या शुभारंभप्रसंगी जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर एम.टी.चौधरी, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, उपसभापती उस्मान तडवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे मामजी उपसभापती सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, डी.सी.पाटील, रमेश पाटील, राजीव पाटील, पितांबर पाटील, सुरेश चिंधु पाटील, भागवत पाटील, प्रा.सी.एस.पाटील, बाजार समिती सचिव गोपाळ महाजन, उप सचिव संतोष तायडे, ग्रेडर पकंज झोले आदी उपस्थित होते.


कापसाला पाच हजार 825 रुपये भाव
शेतकर्‍यांच्या कापसाला सीसीआयने मध्यम स्टेपलसाठी पाच हजार 515, लांब स्टेपल पाच हजार 825 रुपये भाव निश्चित केला आहे. तालुक्यातील 450 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली असून जिल्ह्यात सर्वात उशिराने रावेरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !