केंद्र सरकारने घेतलेला निर्णय संविधानाचं उल्लंघण
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विट ; राज्यसभेत प्रस्तावाच्या विरोधात मतदान
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा होत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला निर्णय हा संविधानाचे उल्लंघण असल्याचे ट्वीट केले आहे. काँग्रेस पक्षाने या निर्णयाचा विरोध करीत राज्यसभेत या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं आह तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयाचा गंभीर परिणाम देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होऊ शकतो, असं राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी लोकांची गरज लागते, जमिनीचे तुकडे करुन राष्ट्र उभं राहत नाही. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जेलमध्ये टाकून संविधानाचं उल्लंघण केलं गेलं. जम्मू काश्मीरचे तुकडे करून राष्ट्रीय एकात्मता मजबूत केली जाऊ शकत नाही, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.