धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोणाचे 80 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 55 हजार 795 वर : एकाच दिवसात 36 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 80 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1328 रुग्णांचा मृत्यू ओढवला तर गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 795 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 54 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 36 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 27
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 06
अमळनेर 00
चोपडा 18
पाचोरा 00
भडगाव 00
धरणगाव 00
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 02
रावेर 10
पारोळा 02
चाळीसगाव 01
मुक्ताईनगर 14
बोदवड 00
अन्य जिल्हा 00


24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात तीन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालय येथे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मयतांमध्ये भुसावळ तालुक्यातील 70, 72, 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !