भुसावळ नगरपालिकेला दहा कोटींचा निधी


आमदार संजय सावकारेंचा पाठपुरावा

भुसावळ : अनूसूचित जाती उपयोजना अण्णाभाऊ साठे नागरि दलितवस्ती योजनातंर्गत भुसावळ नगरपालिकेला नागरि दलित वस्तीत सुविधा पुरविणे कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संजय सावकारे यांनी यासाठी पाठपुरावा केला. या निधीमुळे शहरातील दलित वस्तींमध्ये विविध विकासकामांना वेग येणार आहे. राज्य शासनाने अनूसूचित जाती उपयोजना अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती योजनातंर्गत नगरपालिकांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. यात जिल्ह्यात सर्वाधिक दहा कोटी रुपयांचा निधी भुसावळ पालिकेला मिळाला आहे. या निधीतून शहरातील दलित वस्तींमध्ये विविध विकासकामांना वेग येणार आहे. या निधीसाठी आमदार संजय सावकारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. हा निधी मंजूर झाल्याने दलित वस्तींमध्ये गटारी, रस्ते, सार्वजनिक शौचालये, समाजमंदिर, वॉलकंपाऊंड आदींसह अन्य विकासात्मक व पायाभुत सुविधांची कामे केली जाणार आहेत. यामुळे या भागातील नागरिकांनाही दिलासा मिळेल. शहरातील अनेक दलितवस्ती भागांमध्ये गेल्या काळात विकासात्मक कामे पूर्ण क्षमतेने झाली नाहीत. मात्र आता १० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने या भागांमधील सर्व कामे पूर्ण होतील, अशी आशाही येथील नागरीकांना आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !