राष्ट्रवादीला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवणार : नाथाभाऊ


भुसावळ : भाजपाला माझ्यातील चुका शोधण्यासाठी काहीही न सापडल्याने माझ्यामागे चौकशींचा ससेमिरा लावण्यात आला मात्र त्यातही काहीही आढळले नाही त्यामुळे बिनबुडाचे आरोप करून राज्यभर आपली बदनामी करण्यात आली, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त भुसावळात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तेली समाज मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात ते खडसे बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवती सभेच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा कार्याध्यक्ष रवी वरपे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा ओबीसी सेलचे उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, सतीश घुले, धीरज चौधरी, जय चौधरी, आदींची उपस्थिती होती.



खडसे-चौधरींची दिलजमाई
कधी काळी खडसे-चौधरींमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते होते मात्र खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उभयतांमधील दरी मिटल्याचे दिसून आले. सुप्रीमो शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम माजी आमदार चौधरींनी खडसेंना केक भरवत आपसातील दरी संपवल्याचे दाखवून दिले गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खडसेंनी तेली समाज मंगल कार्यालयात चौधरींसोबत प्रथमच मेळाव्याला हजेरी लावत मार्गदर्शनही केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !