कोरोना सुसाट ! 13 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1223 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 80 हजार 786 वर : एकाच दिवसात 908 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 1223 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1526 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 80 हजार 786 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 68 हजार 981 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 908 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

बुधवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 248
जळगाव ग्रामीण 13
भुसावळ 135
अमळनेर 153
चोपडा 338
पाचोरा 03
भडगाव 30
धरणगाव 31
यावल 45
एरंडोल 29
जामनेर 65
रावेर 19
पारोळा 34
चाळीसगाव 23
मुक्ताईनगर 29
बोदवड 27
अन्य जिल्हा 01

24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 35, 53, 65, 67, 72 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिलेचा, भुसावळ तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा व 20 वर्षीय महिलेचा, चोपडा तालुक्यातील 80 वर्षीय पुरूषाचा व 72 वर्षीय महिलेचा तसेच अमळनेर तालुक्यातील 64 वर्षीय महिलेचा, धरणगाव तालुक्यातील 65 वर्षीय महिलेचा व मुक्ताईनगर तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.


कॉपी करू नका.