खान्देशात भीमा-कोरेगाव रथयात्रा काढणार


कामगार नेते जगन सोनवणे यांची भुसावळातील पत्रकार परीषदेत माहिती

भुसावळ : ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपट 135 कोटी भारतीयांनी पाहण्याचे आवाहन ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपट 135 कोटी भारतीयांनी पाहण्याचे आवाहन कामगार नेते जगन सोनवणे यांनी येथे केले. शासकीय विश्रामगृहावर बुधवारी दुपारी पत्रकार परीषद घेतली. याप्रसंगी ते म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, ज्या समाजाला आपला इतिहास माहित नसतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. हे ऐतिहासीक वाक्य लक्षात घैवून रमेश थेट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट यशस्वी होण्यासाठी खान्देशातील प्रत्येक तालुक्यात ‘भीमा कोरेगाव’ रथयात्रा काढणार असल्याचेही ते म्हणाले.

तर नागरीक ठरू शकतील मानकरी
जगन सोनवणे म्हणाले की, पाचशे रुपयांचा व्हीआयपी पास घेतल्यानंतर नागरीक 21 लाखांच्या सन्मान राशीचे मानकरी ठरू शकतात. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा पुरस्कार, महात्मा ज्योतीबा सामाजिक समता पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आद्यशिक्षिका पुरस्कार, सरदार शिदनाक इनामदार शौय पुरस्कार प्रत्येकी 21 लाखांप्रमाणे देण्यात येणार आहे. जनतेच्या आशीर्वादाने हा पुरस्कार खान्देशालाच मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 14 एप्रिलपासून द बैटल ऑफ भीमा कोरेगाव बुकींग जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भुसावळ येथील प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला पंचायत समितीच्या माजी सदस्य पुष्पा जगन सोनवणे, विशाल पवार, तुषार शिवपूजे, सुनील ठाकूर, गजानन बर्‍हाटे, हरीष सुरवाडे, चंदू पहेलवान, नारू खरारे, बबलू सिद्दीकी, शगीर शहा, अनिल सुरवाडे व विविध दहा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक ओबीसी नेते गोपी साळी यांनी तर सूत्रसंचालन आरीफ शेख यांनी व आभार राकेश बग्गन यांनी मानले.


कॉपी करू नका.