कोविड सेंटरसाठी पालिकेने भरघोस निधी उपलब्ध करावा


माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांची सावदा मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

सावदा : जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नियत्रंण आणण्यावर प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत मात्र सावदा शहराचा मृत्यूदर पाहता स्थानिक स्तरावर पालिका प्रशासनाने अद्ययावत कोविड सेंटर सुरू करावे व त्यासाठी पालिकेला प्राप्त झालेला निधी जिल्हाधिकार्‍यांच्या मागणीतून खर्च करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक राजेश वारनखेडे यांनी केली आहे. लोकसहभागातून या उपक्रमासाठी सहकार्य घ्यावे व ज्यांना शक्य आहे ते या उपक्रमासाठी सहकार्य करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी तसेच रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना त्यांनी निवेदन दिल असून उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्याकडे या मागणीसंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे.

रुग्णांची होते गैरसोय
तालुक्याच्या ठिकाणी रुग्णांना दाखल व्हायचे म्हटल्यास त्यांची गैरसोय होते मात्र स्थानिक स्तरावरच कोविड सेंटर सुरू करण्यात आल्यास त्यांची गैरसोय टळणार आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट टळलेले नाही मात्र दुसरीकडे पालिकेकडे विकासकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची उपलब्धता असून त्याबाबत योग्य ती परवानगी घेवून कोविड सेंटर निर्मितीसाठी प्रयत्न झाल्यास ही बाब सोयीची होणार आहे शिवाय या बाबीला कुणीही विरोध करणार नाही, असेही निवेदनात नमूद आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !