सलून चालकाच्या मृत्यूनंतर पोलिस ठाण्याबाहेर आणला मृतदेह
पोलिस कारवाईदरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणार्या एका सलूनचालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार, 14 रोजी दुपारी 12 वाजे दरम्यान उस्मानपुरा येथे घडली. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी करत प्रेतासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली.
अधिकार्यांची धाव
उस्मानपूरा येथील एका हेअर सलून चालकावर 12 वाजेच्या दरम्यान पोलीस कारवाई करण्यात आल्यांतर पोलिस दठाण्यात नेत असतांना तो खाली पडुन जखमी होवून त्याचा मृत्यू ओढवला व या गंभीर प्रकारानंतर नातेवाईकांनी मृतदेह उस्मानपुरा ठाण्यात नेत संताप व्यक्त केला. सलून चालकाचा मृत्यू पोलिसांमुळेच झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत फिरोज खान कदीर खान या सलून चालकाचा मृत्यू झाला. दोषींना निलंबीत करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी करीत हजारो नागरीक आणि नातेवाईक उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत. वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि दंगा काबू पथकासह दाखल झाले. डीसीपी दीपक गिर्हे , एसीपी रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव , संतोष पाटील, दिलीप तारे आणि, निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहा.निरीक्षक घनश्याम सोनवणे घटनास्थळी दाखल झाले.







