धक्कादायक : कोरोनामुळे पुण्यात कुटूंंबातील चार सदस्यांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालल्याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. कोरोनाने पुण्यातील एका कुटुंबालाच संपवल्याचे बोलले जात आहे. 15 दिवसांच्या अंतरात कुटुंबातील तब्बल पाच सदस्यांचा मृत्यू झाल्याची सांगण्यात आले. जाधव कुटुंबातील आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव व बहीण वैशाली गायकवाड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पूजेच्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आलं होतं. पूजेनंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर एकामागोमाग एक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.



