मुंबई-भागलपूर विशेष अतिरीक्त ट्रेन धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-भागलपूर विशेष अतिरीक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 01203 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23 व 30 एप्रिल रोजी सहा वाजतस सुटल्यानंतर भागलपूर येथे तिसर्‍या दिवशी 6.30 वाजता पोहोचेणार आहे. 01204 विशेष गाडी भागलपूर येथून 18 व 25 व 2 मे रोजी सकाळी 10.30 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 11.45 वाजता पोहोचेणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., सासाराम, गया जं., किउल जं., जमालपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

पुणे-गोरखपूर विशेष ट्रेन
01453 पुणे-गोरखपूर विशेष ट्रेन 16 ते 30 एप्रिलदरम्यान पुणे येथून दर शुक्रवारी 8.20 वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी 9.40 वाजता पोहोचेल. 01454 गोरखपूर-पुणे विशेष ट्रेन 18 एप्रिल ते 2 मे दरम्यान रविवारी गोरखपूर येथून एक वाजता सुटेल व पुणे तेथे तिसर्‍या दिवशी सकाळी पाच वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


सोलापूर-प्रयागराज छिवकी विशेष अतिजलद ट्रेन
01315 विशेष सोलापूर-प्रयागराज छिवकी विशेष अतिजलद ट्रेन 16 ते 30 एप्रिलदरम्यान दर शुक्रवारी आणि सोमवारी सोलापूर येथून नऊ वाजता सुटेल आणि प्रयागराज छिवकी येथे तिसर्‍या दिवशी 4.25 वाजता पोहोचेल. 01316 प्रयागराज छिवकी-सोलापूर विशेष अतिजलद ट्रेन 18 एप्रिल ते 2 मे दरम्यान दर रविवारी आणि बुधवारी प्रयागराज छिवकी येथून 6.30 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसर्‍या दिवशी 12 वाजता पोहोचेल. या गाडीला पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर स्थानकावर थांबा देण्यात आला. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !