ज्योतीषशास्त्र’ शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा : हिंदू जनजागृती समिती


यावल : ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’च्या अंतर्गत’ज्योतिष शास्त्र’हा विषय सुरू करण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून ज्योतिष ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन विद्या असल्याचे हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे. ‘ज्योतिष विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये,’ अशी मागणी काही नास्तिक आणि हिंदु धर्मविरोधी संघटनांनी ज्योतिषशास्त्राचा कोणताही अभ्यास न करता केली आहे. या पार्श्वभूमीवर
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’ने मुठभर ज्योतिषशास्त्र द्वेषी लोकांच्या विरोधाला न जुमानता ’ज्योतिषशास्त्र’ शिकवण्याचा निर्णय कायम ठेवावा ! अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

यावलमध्ये तहसील प्रशासनाला निवेदन
यावल महसूलचे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात विद्यापीठाला आश्वस्त करताना हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, आपल्या या निर्णयामुळे आपल्या विद्यापिठाच्या बाजूने समिती खंबीरपणे उभी आहे.वेळ पडल्यास आम्ही ’ज्योतिष शास्त्रा’च्या समर्थनार्थ रस्त्यावरही उतरू.समाजातील बहुसंख्यांक समाजाचा ज्योतिष शास्त्राला पाठिंबा असल्याने ज्योतिष्य शास्त्र हा विषय विद्यापीठात निडरपणे आरंभ करावा, असेेही निवेदनात नमूद आहे. निवेदनावर हिंदू जन जागृती समितीचे प्रशांत जुवेकर आणी धीरज भोळे ह्यांचा स्वाक्षर्‍या आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !