पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांना संबोधीत करणार


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या कलम 370 मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना बुधवारी संबोधित करणार असून भाषणाची वेळ मात्र अद्याप कळू शकली नाही. केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत जे पाऊल उचलले आहे त्याबाबत नेमकी माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा या मागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी बुधवारी देशाला उद्देशून भाषण करणार होते मात्र माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे यात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


कॉपी करू नका.