पदोपदी महिलांचा अपमान करणे ही भाजपाची प्रवृत्ती : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांची पुणे महापालिकेतील एका महिला कर्मचार्यास शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आमदार कांबळेंनी संबंधित महिला कर्मचार्याची जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रस्त्यावर उतरुन सुनील कांबळे यांचा निषेध नोंदवला आहे.
चाकणकरांची भाजपावर बोचरी टिका
आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे. महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकार्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे. ‘भाजपसारख्या नीचपणाच्या असंस्कृत चिखलात अशीच कमळं उगवणार’, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपवर बोचरी टीका केलीय. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केलंय.






महिला अधिकार्याला केली अर्वाच्च शिविगाळ
आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकार्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकार्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुली दिली. ड्रेनेज विभागातील काम करण्यासाठी पुणे महापालिकेतील एका महिला अधिकार्यास कार्यकर्त्याच्या फोनवरून आमदार सुनील कांबळे यांनी फोन लावला होता. त्यावर संबंधीत महिला अधिकार्यानी वरीष्ठांची परवानगी घ्यावी लागेल, असे म्हटले होते. त्यावर कांबळे यांनी संबधित महिला अधिकार्यास शिवीगाळ केली.
आमदार सुनील कांबळे ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती आहे.
महिलांना सातत्याने कमी लेखणे, पदोपदी महिलांचा अवमान करणे ही भारतीय जनता पक्षाची प्रवृत्ती असून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ करणारे आमदार सुनील कांबळे हे केवळ त्या प्रवृत्तीचे एक उदाहरण आहे.1/2@maharashtra_hmo @PuneCityPolice pic.twitter.com/OqObgC00LX— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 26, 2021


