मुक्ताईनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्या


शेतकर्‍यांच्या विविध समस्यांबाबत भाजपा किसान मोर्चा मुक्ताईनगरतर्फे तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर : अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून केळीवर सी.एम.व्ही., करपा रोग आला असून तालुक्यता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी किसान मोर्चा मुक्ताईनगरतर्फे तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आली. दरम्यान, खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढाव राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चा मुक्ताईनगरतर्फे निवेदन देण्यात देण्यात आले.

ही बातमी वाचली का- लग्नानंतर नवरी निघाली गर्भवती : नवरदेव कुटुंबियांची पोलिसात तक्रार







शेतकरी उद्ध्वस्त : ओला दुष्काळ जाहीर व्हावा
मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकावर सी.एम.व्ही., करपा रोग आलेला असून अतिवृष्टीमुळे कपाशी, तूर, उडीद, मुग अन्य इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच कृषी पंपाचे इलेक्ट्रिक बिल पूर्णपणे माफ करणे, कोरडवाहू शेतीला एकरी 50 हजारांप्रमाणे मदत करावी, बागायती शेतीला एकरी एक लाख रुपये मदत करावी, केळीला बोर्ड भावानुसार भाव द्यावा, उसाला हमीभावाची एक रकमी रक्कम द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. केळीवरील सी.एम.व्ही.चे 2020-21 मध्ये व 2020-21 मध्ये वादळामुळे नुकसान होऊन पंचनामे झाले असून सरकारकडून आजपावतो नुकसान भरपाई दिली गेली नसल्याने ही नुकसान भरपाई तत्काळ मिळण्याची मागणी करण्यात आली.

यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदन देताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रशांत महाजन, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल महाजन, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष पंकज पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, किसान मोर्चा सदस्य अतुल महाजन, राजेंद्र चौधरी, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष जयेश कारले व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी वाचली का- बोंबला : लग्न अन तेही प्रेशर कुकरशी ! मग ही बातमी वाचाच



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !