पाचोरा येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू


पाचोरा : कृष्णापूरी येथील रहिवासी वाल्मिक महाजन (58) यांचे 2 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सर्पदंश झाल्याने निधन झाले. सायंकाळी शेतात जाऊन गुरांना चारापाणी करुन व दुध काढून घरी येत असतांना त्यांना एका विषारी सर्पाचे दंश केला. वाल्मिक महाजन यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुणालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डॉ.आमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई नातवडे असा परीवार आहे. वाल्मिक महाजन हे भारतीय सैन्य दलातील स्वप्निल महाजन यांचे वडील होत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !