एच.आर.मॅनेजर तरुणीची आत्महत्या


नवी दिल्ली : एचआर मॅनेजर पदावरील तरूणीने गळफास घेत आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या इंदुरमधील नरीमन पॉइंटमध्ये ही घटना घडली. शालू निगम असे मयताचे नाव आहे. तरूणी मुळची सतना येथे राहणारी आहे आणि इंदुरमध्ये देव विग्रो कंपनीत एचआर पदावर काम करत होती. तीन दिवसांआधीच तिने राजीनामा दिला होता. घटनास्थळाहून एक सुसाइड नोटही मिळाली आहे. ज्यात तिने लिहिलं की, तिच्यावर कुणीही आत्महत्येचा दबाव टाकला नाही. त्यासोबतच इतरही काही गोष्टी तिने लिहिल्या आहेत. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. एचआर मॅनेजर शालू निगम मूळची सतना येथे राहणारी होती. ती तिच्या बहिणीसोबत राहून गेल्या 3 वर्षापासून एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. जेव्हा सायंकाळी लहान बहीण घरी परतली तेव्हा तिला तिचा मृतदेह लटकलेला दिसला. तिने लगेच याची सूना पोलिसांना आणि परिवाराला दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवला.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
कुटुंबियांनी कंपनीतील स्टाफवर आरोप केला आहे की, शालू काही गोष्टीमुळे ऑफिसमध्ये टेंशनमध्ये होती. पोलिसांनी एक सुसाइड नोट सापडली आहे. मृत तरूणीचे मामा राकेश म्हणाले की, आम्हाला सूचना मिळाली की, भाचीने फाशी घेतली आहे. 2 दिवसांआधीच तिच्यासोबत बोलणं झालं होतं. सांगत होती की, ऑफिसमध्ये टेंशन आहे. कंपनीत काम करणारा तिचा सहकारी मानपाल सिंहने सांगितलं की, कंपनीत कोणतंही टेंशन नव्हतं. तिने तिच्या मर्जीने नोकरी सोडली होती. तिला कारण विचारलं तर तिने काही सांगितलं नाही. त्याबाबत काही माहीत नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचली का- रावण काळाच्या पडद्याआड : अरविंद त्रिवेदींचे निधन 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !