मुक्या प्राण्यांवरील अन्याय थांबवा : भारतीय शाकाहार संघाची मागणी


भुसावळ : मुक्या प्राण्यांवर आणि गोवंशावर होणारा अत्याचार थांबवून गोवंशाची कत्तल रोखावी व महाराष्ट्रात लागू असलेला गोवंश हत्या बंदीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी भारतीय शाकाहार संघ व गोसेवा मित्र परीवार व पर्यावरण प्रेमींनी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी नायब तहसीलदार सविता नाथ यांनी निवेदन स्वीकारले.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना भारतीय शाकाहारी संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन, गोसेवा परीवाराचे रोहित महाले, अनिकेत साळी, चेतन पवार, गौरव साळी, दुर्गेश झोपे आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !