क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच के.पी.गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात
पुणे : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेला के.पी.गोसावी यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेले के.पी.गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून पसार होते. के.पी.गोसावी यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप के.पी.गोसावी यांच्यावर आहे. गुरुवारी सकाळी पुणे पोलिसांनी गोसावी यांना अटक केली. मंगळवारी संध्याकाळी के.पी.गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ते शरण न आल्याने त्यांना गुरुवारी सकाळी अटक केली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
