कलम 370 रद्द झाल्याने खर्या अर्थाने होणार जम्मू-कश्मिरचा विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी ; लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासीयांशी संबोधन
नवी दिल्ली : देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरीरक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकर्या, विविध योजना या नागरीकांना मिळत नव्हत्या मात्र आता कलम 370 रद्द झाल्याने तेथील जनतेचा फायदाच होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुरुवारी रात्री त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला.