शरद पवार म्हणाले ; आमचे हेलिकॉप्टर आदळले असते मात्र….!


मुंबई : भारताचे पहिले संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व लष्करातील अधिकार्‍यांसह 13 जणांचा तमिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र या घटनेविषयी शोक संवेदना व्यक्त होत आहे. या अपघाताचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नसलेतरी आता ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होणार आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामानामुळे समोर काहीही दिसत नव्हते मात्र महाराष्ट्राची आपल्याला माहिती असल्याने आपण पायलटला हेलिकॉप्टर कळसूबाई शिखरावर नेण्यास सांगितल्यानंतर सुरक्षीतरीत्या आम्ही उतरू शकलो, अशी आठवण त्यांनी सांगितली.

शरद पवार म्हणाले : महाराष्ट्राची संपूर्ण माहिती असल्याने बचावलो
शरद पवार यांच्या एका हेलिकॉप्टर प्रवासाचे वर्णन टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. या प्रवासाचा अनुभव सांगताना शरद पवार म्हणाले, ‘माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो. त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलिकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.’ आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे मी सांगितले, महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वांत उंच शिखर आहे ते 5 हजार फुटांच्यावर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण 7 हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो,’ असेही पवार यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !