दहा लाखासाठी विवाहितेचा छळ ; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा


चाळीसगाव : माहेरून फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा
याबाबत वृत्त असे की, रिंकु दिनेश राणा (40, ह.मु. चाळीसगाव) या विवाहितेचा विवाह सन: २००६ साली नागपूर येथील दिनेश विठ्ठलराव राणा यांच्याशी झाला. सुरूवातीला एक वर्ष पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र नंतर फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून १० लाख रुपये घेऊन ये ), असे सांगून रिंकुचा शारीरीक व मानसिक छळ सासरच्या सदस्यांकडून आजपावेतो करण्यात आका. या प्रकरणी रिंकु दिनेश राणा हिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !