जुन्या वादातून दोघांना बेदम मारहाण : एकाविरोधात गुन्हा
जामनेर : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील जामनेर पुरा भागात घडली. याप्र करणी जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जुन्या भांडणातून केली मारहाण
दीपक दामू कचरे (41, रा.जामनेर पुरा, जामनेर) हा तरुण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास शहरातील विवेकानंद भागात त्याचा मित्र उल्हास नेमाडेसह चर्चा करत होते. त्याचवेळी अजय उर्फ अशोक वाल्मिक लोहार (रा. विवेकानंद नगर, जामनेर) हा आला. त्याने जुन्या वादातून दोघांना शिवीगाळ व मारहाण केली. या मारहाणीत दीपक कचरे याच्या हाताला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी दीपक कचरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक लोहार याच्याविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजेंद्र पगारे हे करीत आहे.




