दोन दुचाकींना ट्रकची धडक : जळगावात तरुणाचा मृत्यू


जळगाव : शहरातील ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या 30 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तिघे जखमी झाले.

गॅरेज काम करणार्‍या तरुणाचा मृत्यू
शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा रवी गणेश बोरसे (30) हा तरूण गॅरेजवर काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्यासोबत त्याचा मित्र योगेश जगन्नाथ पाटील (36, रा. एमआयडीसी, जळगाव) हा देखील गॅरेजवर काम करतो. दोन्ही वेगवेगळ्या गॅरेजवर काम करत असल्याने दोघे परीचीत होते. रविवार, 19 डिसेंबर रोजी दुपारी योगेश पाटील हा त्याची दुचाकीने ट्रान्सपोर्टनगरकडून येत असतांना रवी बोरसे हा कालिका माता मंदीराजवळ योगेशच्या दुचाकीवर बसून शहराकडे येण्यास निघाले. राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या रवी बोरसे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक योगेश हा किरकोळ जखमी झाला.





अन्य दुचाकीस्वारही अपघातात जखमी
दरम्यान, या अपघातात दुचाकीच्या बाजूला अजून एका दुचाकीला देखील ट्रकने धडक दिली. यात देखील इतर अनोळखी दोन जण जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. मयत रवी बोरसेच्या पश्चात आई सुमन, वडील गणेश नामदेव बोसरे, अक्षय, मनोज व पियूष हे तीन भाऊ असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !