सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल : तरुणीविरोधात गुन्हा


जळगाव : खाजगी क्लासेसचा डाटा कॉपी करून सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करून फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल देवेंद्र चढ्ढा (50, रा.विशाल कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जून 2016 ते 2017 दरम्यान दीपाली दीपक भदाणे यांनी चढ्ढा यांच्या खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची यादी इतर व्यक्तींना मेलद्वारे पुरवली. क्लास मॅनेजमेंट व ओएमआर या सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केल्याची फिर्याद चढ्ढा यांनी दिली आहे. त्यानुसार दीपाली भदाणे यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !