महिलेचा विनयभंग : आरोपीला दोन वर्षांची शिक्षा


पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा
5 डिसेंबर 2018 रोजी कलम 354 (अ) नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात आरोपी नितीन सुभाष पाटील (बदरखे) याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. न्यायालयाने या प्रकरणात चार साक्षीदार तपासले आहेत. आरोपी नितीन सुभाष पाटील (बदरखे) यास न्यायमूर्ती एफ.के.सिद्दीकी यांनी या गुन्ह्यात दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पाच हजार रुपये दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याचा कारावास वाढविण्यात येणार आहे. सरकारतर्फे सरकारी वकील अ‍ॅड.आर.के.माने यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल दीपक (आबा) पाटील, विकास सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !