नवी मुंबईत कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त

तिघे पोलिसांच्या जाळ्यात : कारखान्यावर केली कारवाई


नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी पार्टीसाठी आणण्यात आलेले कोट्यवधी रुपये किंमतीचे अडीच किलो वजनाचे एमडी ड्रग्ज केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांमध्ये हे ड्रग्ज जाण्यापूर्वीच संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नवी मुंबई पोलसांना 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी एमडी या ड्रग्सचा मोठा साठा शहरात असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी कलीम खामकर याला पनवेल येथून ताब्यात घेतले. अधिक माहिती घेतली असता त्याचा सहकारी जकी पिट्टू आणि सुभाष पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत तिघांना अटक केली. आरोपी सुभाष पाटील याने केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्ज पावडर बनवण्याबाबत ज्ञान होते. तपासाच्या शेवटी या तीनही आरोपींकडून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचे अडीच किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या आरोपींनी अलिबाग येथील पोयनाड येथे ह्या एमडी ड्रग्सच्या निर्मितीसाठी चक्क एका कारखान्याची निर्मिती केली होती. नवी मुंबई पोलिसांनी या कारखान्यावर कारवाई करत कारखानाही सील केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !