नागपुर शहरातही आता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत राहणार बंद !


नागपूर : मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यानंतर आता नागपूरमध्येही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. नागपूरमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा येत्या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोठी कारवाई : पुलवामात तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

नागपूरातही आता शाळा बंदचा निर्णय
कोरोनाच्या ओमिक्रॉन या अवताराने सध्या धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे. बाधितांची संख्या दररोज कैक पटीने वाढत आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र विशेष खबरदारी घेतली जात आहे. राज्य सरकारनेही राज्यात कोरोना निर्बंध लागू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री राऊत यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतली. त्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णयाला संमती देण्यात आली आहे.

‘बुली बाई’ प्रकरणातील मास्टर माईंड महिला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !