माजी मंत्री खडसे म्हणाले ; 40 वर्ष भाजपात सोबत असताना तेव्हा का नाही लावली ईडी ?
रावेर : चाळीस वर्ष जेव्हा मी तुमच्यासोबत होतो, तेव्हा चांगला होतो. मग आता राष्ट्रवादीत (NCP) येताच माझ्या मागे ईडी (ED) लावण्यात आली मात्र एक लक्षात ठेवा तुम्ही जे करत आहात, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल, जनता तुम्हाला माफ करणार नाही,” असे त्यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीसांचं (Devendra Fadanvis) नाव न घेता सुनावले. रावेर (Rawer) तालुक्यातील तांदलवाडी (Tandalwadi) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. तपास यंत्रणेला हाताशी धरुन भाजप (BJP) सुडबुद्धीचं राजकारण करीत असल्याची आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी यावेळी केला.
हा तर पक्ष बळकट करणार्याचा अपमान
राष्ट्रवादीत गेल्यापासून आपल्या मागे ईडीची (ED) चौकशी लावली जात असून तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे, असे खडसे यांनी सांगितले. भाजप पक्षाच्या (BJP Party) विस्तारासाठी मी गाव पातळीवर परीश्रम घेतले तसेच कष्ट केले मात्र ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहिले, आता त्याचाच तुम्ही असा अपमान केला. अनेक लोक घडवलेत, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. अनेक जण नाथाभाऊंच्या (Nathibhau) आशीर्वादाने मोठे झालेत. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परीषद सदस्य झालेत. जिल्हा परीषद अध्यक्ष केले. मेहनतीने कष्टाने माणसं उभी केलीत. 30 वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढे पक्ष वाढत गेला. गावा-गावामध्ये पक्ष पोहोचला, सार्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली, असेही खडसे (Eknath Khadse) म्हणाले.


