भीषण अपघातात तिघे जागीच ठार : या तालुक्यातील घटना
सोलापूर : स्कार्पिओ (Scorpio) झाडाला धडकून झालेल्या अपघातांमध्ये सोलापुरातील (Solapur) तिघे जागीच ठार झाले. हा अपघात (Accident) घटना शनिवारी मध्यरात्री 11.45 वाजता घडला. दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यातील औराद येथून सोलापूरकडे (Solapur) येत असताना ही घटना घडली.
यांचा अपघातात मृत्यू
या अपघातात (Accident) किशोर अण्णाराव भोसले (45, रा.सळई मारुती मंदिर, उत्तर कसबा), नितीन भगवान भांगे (32, रा.निराळे वस्ती, सोलापूर), व्यंकटेश राम म्हेत्रे (45, रा.मोदी खाना सोलापूर) असे ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. याच अपघातात (Accident) राकेश हुच्चे (रा.सोलापूर) हा एक जखमी आहे.

झाडावर धडकली स्कॉर्पिओ
तिघे जण स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच.13 ए.झेड.9909) (Scorpio) मध्ये बसून औरादवरून सोलापूरच्या (Solapur) दिशेने येत असताना वाहन तेरामैलजवळील वकील वस्तीजवळ आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला (Tree) जोरात धडकून गंभीर जखमी झाले. तिघांना पहाटे 3.50 वाजता मित्र संभाजी जुगदार यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नितीन भांगे (Nitin Bhange) हा मंडप कॉन्ट्रॅक्टर असून तिघेही लाईट डेकोरेशनच्या कामासाठी औराद परिसरात गेले होते. काम संपवून रात्री घरी परतत येत असताना अपघात (Accident) झाल्याचे समजते. याची नोंद सिव्हील पोलिस चौकीत (Civil Police Chuki) झाली.
