भुसावळातील बँक ऑफ बडोदा शाखेत दरोड्याचा प्रयत्न फसला

लष्करी प्रतिबंधीत क्षेत्रातील घटनेने शहरात उडाली खळबळ : पोलिस अधिकार्‍यांनी केली पाहणी


भुसावळ : शहरातील आरपीडी रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरीजवळील (Bhusawal RPD Road Ordanance Factory) लष्करी प्रतिबंधीत क्षेत्रात असलेल्या बँक ऑफ बडोदा शाखेत (bank of baroda branch)  चोरट्यांनी पाठीमागील भिंत फोडून स्ट्राँग रूम (Strong Room) फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार, 17 रोजी सकाळी उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा परीसर लष्कराच्या (मिल्ट्री) अंतर्गत येतो शिवाय सैन्याचा खडा पहारा या भागात 24 तास असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

सलग सुट्या आल्याने चोरट्यांनी साधली संधी
आरपीडी रस्त्यावर भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी (Bhusawal RPD Road Ordanance Factory) असून त्या लगतच लष्कराच्या परीसरात 118 टीए मिल्ट्रि बटालियन परीसरात बँक ऑफ बडोदाची शाखा (bank of baroda branch) आहे. या बँकेत हजारो लष्करातील कर्मचार्‍यांचे बँक खाते असून दररोज लाखोंची उलाढाल होत असते शिवाय बँकेत जाण्यापूर्वी लष्करी डेपोतून प्रवेश करावा लागतो व तेथे सलग 24 तास जवानांचा खडा पहारा असतो मात्र शनिवार व रविवार लागून आलेल्या सुट्यांमुळे चोरट्यांनी प्लॅन रचला व बँकेच्या बंद पडलेल्या शौचालयाला भगदाड करून बँकेचे स्ट्राँग रूम गाठले तसेच स्ट्राँग रूमचे चॅनल गेटचे कुलूप अर्धवट कापण्याचा प्रयत्नही झाल्याचे सोमवारी बँक उघडल्यानंतर अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली मात्र सुदैवाने स्ट्राँग रूम  (Strong Room) न फुटल्याने लाखोंची रक्कम सुरक्षित राहिली. शहरात चोर्‍या, घरफोड्या नवीन नाहीत मात्र चोरट्यांनी आता थेट लष्कराच्या ताब्यात असलेल्या परीसरात चोरीचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिस अधिकार्‍यांची धाव : रोकड सुरक्षित
बँकेच्या लॉकरमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती असून ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. भुसावळातील बँक ऑफ बडोदा शाखेचे चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी (add.sp chandrakant gawali), भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे (dysp somnath waghchure), शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे  (city pi pratap engale) व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, बँकेचे व्यवस्थापक भूषण दत्तु येवलकर यांनी भुसावळ शहर पोलिसात (Bhusawal City Police) दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि 454, 457, 380, 511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे संशयीतांची चौकशी
लष्कराच्या प्रतिबंधीत परीसरात बँक फोडण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. या परीसरातील सीसीटीव्हीच्या (cctv) आधारे पोलिसांकडून संशयीतांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे (city pi pratap engale) यांनी दिली. सलग आलेल्या सुट्यांमध्ये शनिवार व रविवारी तसेच त्यापूर्वी बँक परीसरात नेमके कोण आले व गेले याची माहिती पोलिसांकडून काढली जात असून त्या दृष्टीने संशयीतांची चाचपणीही केली जात आहे शिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहितीदेखील काढली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !