हिंगोणा- सावखेडा जि.प.गटात विकासकामांचे उद्घाटन

जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव यांच्या प्रयत्नांना यश


यावल :हिंगोणा-सावखेडा जिल्हा परीषद गटाच्या सदस्य सविता अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून हिंगोणा जिल्हा परीषद गटातील विविध गावात एक कोटी साडेतीन लक्ष रुपयाचंच्या कामाचे भूमिपूजन व प्रत्यक्ष बांधकामाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरालाल चौधरी, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, तालुका भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे, उपसभापती योगेश भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले.

या कामांचे उद्घाटन
जिल्हा परीषद जळगाव अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध निधी अंतर्गत जिल्हा परीषद सदस्य सविता अतुल भालेराव यांच्या प्रयत्नातून सावखेडा -हिंगोणा जि.प गटात सावखेडा येथे शाळा खोल्यांचे बांधकाम, शाळा खोली ग्राउंडवर पेव्हर ब्लॉक बसवणे, मोहाडी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परीषद अंतर्गत अंगणवाडीचे बांधकाम, वड्री येथे नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम, वड्री येथील ईदगाहजवळ काँक्रिटीकरण, वड्री वस्तीत काँक्रिटीकरण, वड्री रस्ता डांबरीकरण, कोळवद-कोरपावली रस्ता 12 लक्ष रुपये अशा एकूण एक कोटी साडेतीन लाख रुपये खर्चाच्या विविधकामांचे भूमिपूजन पंचायत समिती सभापती पल्लवी पुरुजीत चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी, जि.प.सदस्य सविता अतुल भालेराव, भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, उपसभापती पंचायत समिती योगेश भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कृषिभूषण नारायण बापू चौधरी, अखिल भारतीय सरपंच परीषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी, कांचन फालक, भाजपाचे पंचायत समिती गटनेता दीपक अण्णा पाटील, भाजपा सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, देविदास नाना पाटील, कृउबा संचालक तथा विकास सोसायटी कोरपावलीचे चेअरमन राकेश फेगडे, लहू पाटील, भाजपाचे वड्रीतील कार्यकर्ते अतुल भालेराव, लक्ष्मण बडगुजर, बेबाबाई विकास पाटील, सरपंच सावखेडा मुबारक सुभेदार तडवी, उपसरपंच दिनेश पाटील, भूषण पाटील, कमलाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती उमेश पाटील, बंडू पाटील, मोहराळा येथील सरपंच नंदा गोपाळ महाजन, उपसरपंच जहांगीर तडवी, संजीव महाराज, गोपाळ महाजन, अकिल तडवी, प्रमोद महाजन, अनिल अडकमोल, राजू तडवी, यशवंत पाटील, सलीम तडवी (सर), वड्री सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी, नबाब तडवी, उमाकांत पाटील, ललित चौधरी, सरदार तडवी, पूजा तडवी, नयना चौधरी, वैशाली चौधरी, आर.के.चौधरी, विलास चौधरी, गोविंदा सुरवाडे, सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !