जळगावातून दुचाकी लंपास
जळगाव : शहरातील मेस्कोमाता नगरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
घराच्या पार्किंगमधून लांबवली दुचाकी
बादलसिंग भीमसिंग जोहरी (40, रा.मेस्कोमाता नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून बेनटेक्स ज्वेलरी व्रिकी करून आपला उदरनिर्वाह करतात. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 डी.जी. 866) असून गुरुवार, 10 फेब्रुवारी रोजी दिवसभर व्यवसाय करून रात्री घरी आले. त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्कींग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आला. सायंकाळी पाच वाजता शनीपेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने शनीपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.





