बळीराम पेठेतील व्यापार्‍याचा महागडा मोबाईल लांबविला


जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स जवळून व्यापार्‍याचा 20 हजाराचा मोबाईल चोरट्याने लांबवला. जळगाव जिल्हापेठ पोलिसात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
बळीराम पेठेतील व्यापारी गुरफान उस्मान शेख (33) हे सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये आल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉम्प्लेक्समधील जम्बो झेरॉक्स दुकाना समोरुन अज्ञात चेारट्याने त्याच्या खिश्यातून 20 हजारांचा मोबाईल अलगद लांबवला. मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शोधाशोध केली मात्र मोबाईल आढळून न आल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस नाईक सुभान तडवी करत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !