भरधाव रीक्षाची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार जखमी


जळगाव : अजिंठा रोडवरील आर.एल.चौफुलीजवळ भरधाव वेगाने जाणार्‍या रीक्षा चालकाने उजव्या बाजुला वळण घेतल्याने मागुन येत असलेल्या दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात दुचाकीस्वार जखमी
जळगाव तालुक्यातील कसुंबा गावातील गणपती नगरात राहणारा शुभम सतिष पाटिल (27) हा तरुण शहरात खासगी नोकरी करुन कुटूंबाचा उदनिर्वाह चालवतो. मंगळवार, 15 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शुभम त्याच्या दुचाकीने कुसूंबा घराकडे येत असतांना अजिंठा रोडवरील आर.एल.चौफुलीजवळ त्याच्या दुचाकीपुढे चालत असलेल्या ऑटो रीक्षा चालकाने कुठलेही इंडीकेटर न देता, हात न बाहेर काढता तशीच सुसाट वेगात ऑटो रीक्षा उजव्या बाजुला वळवल्याने शुभम दुचाकीसह त्याच्या रीक्षावर आदळून गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या जबाबावरुन रात्री 8 वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संजय धनगर तपास करत आहेत.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !