जळगाव हादरले : मुलीस पळविल्याच्या संतापातून मुलाच्या आईला जाळण्याचा प्रयत्न
जळगाव : मुलीस पळवून नेल्याच्या रागातून तिच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीला पळवून नेत केले लग्न
आशा अशोक तलरेजा (55, रा.सिंधी कॉलनी) यांचा मुलगा राहुल याने अंजू शंकर राजपाल यांच्या मुलीस पळवून नेत लग्न केले आहे. यामुळे राजपाल कुटुंबीयांनी सोमवार, 14 रोजी दुपारी एक वाजता चेतन सर्वानंद राजपाल, रोश सर्वानंद राजपाल, मुन्ना सर्वानंद राजपाल, अंजू शंकर राजपाल व करू मुन्ना राजपाल यांनी आशा तलरेजा शिवीगाळ करत धमकी दिली.त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुन्हा आले. यावेळी त्यांनी बाटलीतून पेट्रोल आणले होते. पुन्हा एकदा त्यांनी आशा तलरेजा यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रसंगी मुन्ना याने बाटलीतून आणलेले पेट्रोल आशा यांच्या अंगावर ओतले तर चेतन याने माचीस पेटवून आशा यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने काही नागरीकांनी आशा यांची सुटका केली. याप्रकरणी आशा तलरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.





