भुसावळातील गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार : प्रांताधिकार्‍यांचे आदेश


भुसावळ : भुसावळ शहरातील सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍यांचे अनेक प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात (bhusawal prant office) पाठवण्यात आले होते. यातील एका प्रस्तावावर निर्णय झाला असून एका संशयीताला सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी आदेश काढले आहेत. मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख (प्रल्हाद नगर, रींग रोड, भुसावळ) असे या संशयीताचे नाव आहे.

सहा महिन्यांसाठी हद्दपार
पोलिस प्रशासनाकडून पालिका निवडणूकीच्या (palika election) पार्श्वभुमीवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आले असून काही प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आले आहेत त्यांची चौकशी होऊन काही प्रस्ताव हे निर्णयाप्रत आल्याचे समजते. भुसावळ शहरातील प्रल्हाद नगरातील रींग रोडवरील रहिवासी मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी सुलाणे यांनी नुकतेच काढले आहे. बाजारपेठ पोलिसांकडून हे आदेश बजावण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी अनेक जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून पाठवले असून कोणाचे हद्दपारीचे आदेश निघतात? याकडे उपद्रवींसह पोलिसांचे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !