पाचोरा-मोंढाळा रस्त्यावर दुचाकींमध्ये अपघात : दुचाकीस्वार ठार
पाचोरा : पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन सातगाव डोंगरी येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सागर विजय परदेशी (28) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
दोन दुचाकी समोरा-समोर धडकल्या
पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावरील म्हसोबा बाबा मंदिराजवळ शनिवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.19-डी.ई.3296) व (एम.एच.21 ए.ए.2539) मध्ये समोरा-समोर जोरदार धडक झाली. या अपघात सातगाव डोंगरी, ता.पाचोरा येथील सागर विजय परदेशी (28)याचा जागीच मृत्यू झाला तर यमराज धर्मराज पाटील, गणेश भीमराव पाटील व गोपाल हारसिंग पाटील (तिघे रा.अंतुर्ली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातातील दोन्ही दुचाकी मोठे नुकसान झाले.





