सोशल मीडियावर फोटो व्हायरल करीत तरुणीची बदनामी


जळगाव : तरूणीचे तरुणासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत जळगाव सायबर पोललिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनोळखीविरुद्ध पोलिसात गुन्हा
एरंडोल तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. या तरूणीचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून २३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान अनोळखी व्यक्तीने तरुणीचे तिच्या ओळखीच्या तरुणासोबतचे एकत्र असलेले फोटो बनावट इन्स्टाग्रामच्या खात्यावरून व्हायरल केले तसेच खरे असल्याचे भासवत तरुणीच्या ओळखीच्या लोकांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून तरुणीची बदनामी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली असून या तक्रारीवरून बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !