वाहनाच्या धक्क्यात भिंत कोसळून अंगावर पडल्याने बालकाचा मृत्यू ; तीन गंभीर जखमी
पाचोरा : तालुक्यातील वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक सुरू असतांना डीजे गाडीचा धक्का भिंतीला लागल्याने भिंत कोसळली व या घटनेत 12 वर्षाचा मुलगा जागेवरच ठार झाला तर 3 जण जखमी झाले आहे.
बालकाचा मृत्यू ; तिघे जखमी
पाचोरा तालुक्यातील वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान डीजे असलेले वाहन मागेपुढे घेत असतांना वाहनाचा धक्का भिंतीला लागल्याने भिंतीवरील काही भाग अचानक कोसळुन हर्षल गोकुळ पाटील (खंबाट) या १२ वर्षाच्या बालकाच्या अंगावर कोसळला. भिंतीला लावलेल्या जुनाट व मोठ-मोठ्या विटा असल्याने त्या खाली तो दबला जावून त्याच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढल्या नंतर काही युवक पडलेल्या विटा बाहेर काढत असतांना त्यांना हर्षलच्या पायाची हाडे सापडली. तर यात प्रदीप प्रकाश तळेकर (२२), रोहित विनोद गव्हांडे (१२) व साही रामेश्वर शिंदे (१०) ही तीन बालके गंभीर जखमी झाली. जखमीवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयताच्या मागे आई, वडील व एक मोठा भाऊ असा परीवार आहे. या घटनेमुळे परीसरात मोठी शोककळा पसरली आहे.





