धरणगावात सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

वृद्धाला धरणगाव पोलिसांनी केली अटक


धरणगाव : 62 वर्षीय वृद्धाने अवघ्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याने शहरासह परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. चंदुलाल शिवराम मराठे (62) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

चिमुकलीवर अत्याचाराने उडाली खळबळ
संशयीत आरोपी चंदूलाल मराठे याची एका भागात पीठ गिरणी असून गावातीलच एका भागातील महिला रविवारी दुपारी तीन वाजता सहा वर्षीय बालिकेसह पीठ गिरणीवर आल्यानंतर काही वेळाने संशयीताने बालिकेशी अश्लील वर्तन केल्याची बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेने दोन्ही मुलींना घरी आणल्यानंतर सायंकाळी धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार घेतल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडीत बालिकेची वैद्यकीय तपासणी धरणगाव ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, आरोपी चंदुलाल शिवराम मराठे (62) यास अटक केल्यानंतर सोमवारी धरणगाव न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !