जळगाव-मुंबई विमानसेवा उद्यापासून ‘पूर्ववत’ होणार !


जळगाव : जळगाव-मुंबई विमानसेवा बुधवारपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती तर अहमदाबाद विमान सेवेसाठी 15 मार्चपर्यंत वाट पहावी लागणार आहे. ट्रु-जेट कंपनीच्या व्यवस्थापकीय समस्या व एअरक्राफ्ट दुरुस्तीच्या कारणाने सेवा 7 फेब्रुवारीपासून बंद आहे. कंपनीतर्फे आरसीएस उपक्रमांतर्गत देशात 26 विमान तळांवर सेवा दिली जाते. या सर्व ठिकाणी विमानसेवा बंद ठेवण्यात आली मात्र आता ती सुरू बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे राष्ट्रीय विपणन प्रमुख नैमिश जोशी म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !